अनोख्या पद्धतीने कतरिनाने विकीची उडवली थट्टा

Vicky Kaushal & Katrina Kaif  image share

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. लग्नानंतर हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. दोघेही एकमेकांची काळजी घेताना दिसतात. तसेच एकमेकांवरचं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून (image share) व्यक्त करत असतात. नुकताच कतरिना कैफने (Katrina Kaif) विकी कौशलच्या एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कतरिनाने विकीची चेष्टा केली आहे.

कतरिनाने शेअर केलेल्या या जाहिरातीच्या व्हिडिओला ‘आता लवचिकता आली आहे’ (now there is flexibility) असं कॅप्शन देत विकीची (Vicky Kaushal) चेष्टा केली आहे. ही जाहिरात फ्लेक्झिबल ऑनलाईन पेमेंट संदर्भात आहे. त्यामुळे कतरिनाने तो धागा पकडून विकीची चेष्टा केली आहे. कतरिनाची ही इन्स्टा पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला, महिला दिनी विकी कौशलने (Vicky Kaushal) त्याच्या चाहत्यांना त्याची आई वीणा कौशल आणि त्याची पत्नी कतरिना कैफ यांचा (Katrina Kaif) खूप सुंदर फोटो (image share)  सोशल मीडियावर टाकून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. फोटो शेअर करत त्याने “माझी ताकद. माझं जग,” असं कॅप्शन दिलं होतं.

कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सलमान खानसोबत टायगर 3 या चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार टायगर 3 या चित्रपटाचे आऊटडोर शेड्यूल दिल्लीत पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 10 ते 12 दिवस शूटिंग होणार आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं शूटिंग तुर्कस्थान, रशिया, ऑस्ट्रियासह इतर देशांतही झाल्याची चर्चा आहे. कतरिनाने विजय सेतुपतीसोबत ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार असल्याची चर्चा आहे.


हेही वाचा :


सोने दर उतरला, चांदीचा भावही घसरला…


मित्रासोबत फोटो काढण्याचा मोह जीवावर बेतला


पेटीएम शेअर्सची किंमत घसरली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *