कतरिनासोबत करायचे होते लग्न मात्र, पोहोचला थेट तुरुंगात

प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मनविंदर सिंग असे या आरोपीचे नाव आहे. आज सोमवारी विकी आणि कतरिनाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने कतरिना कैफवर एकतर्फी प्रेम करत असल्याची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर कतरिना कैफच्या प्रेमात तो इतका वेडा झाला होता की त्याला अभिनेत्रीशी लग्न करायचं होतं.

काय आहे नेमकं प्रकरण – 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कतरिना कैफचा (vicky kaushal) पाठलाग करत होता. कतरिना या माणसाच्या पाठलागामुळे त्रासली होती. यामुळे अखेर तिने तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलला याबाबत सांगितले. यानंतर विकी कौशलने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विक्कीने आरोपीला प्रश्न विचारल्यावर त्याने अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 506-2 आणि 354-डी अंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रार नोंदवल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी मनविंदरला अटक केली.

स्टार्स त्यांच्या चाहत्यांना तेवढेच प्राधान्य देतात, जेवढे त्यांच्यासाठी घातक नसते. कोणीही कोणाचाही जबरा फॅन असू शकतो, पण एखाद्या चाहत्याने जीवे मारण्याची धमकी दिली तरी हे आपण पहिल्यांदाच ऐकले असेल. कतरिना कैफचे लाखो चाहते आहेत. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कधी-कधी कतरिना तिच्या चाहत्यांच्या कमेंटलाही उत्तर देते. कतरिनाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. पण कदाचित कतरिनाने कधीच विचार केला नसेल की कोणीतरी तिच्यासाठी इतका वेडा असू शकतो, जो तिच्या जीवाला धोका निर्माण करेल.

सध्या अभिनेत्री कतरिना कैफ ही टायगर 3 मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. याशिवाय कतरिनाच्या खात्यात एक फोन भूत हा चित्रपटही आहे, यात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Smart News :


टीम इंडियाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त, आयसीसीनं ठोठावला सर्व खेळाडूंना दंड!

Leave a Reply

Your email address will not be published.