कतरिना- विकीने शेअर केले रोमँटिक फोटो..! पाहिलेत का?

अभिनेत्री कतरिना कैफ (kay beauty) आणि तिचा नवरा अभिनेता विकी कौशल हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. एकमेकांवरील प्रेम दाखवणारे फोटो ते सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहते भरभरून लाईक्स आणि कॉमेन्टसचा वर्षाव करत असतात. आता देखील बॉलिवूडमधील हे रोमँटिक कपल सुट्ट्यांवर गेले आहेत. तिथले दोघांचे रोमँटिक फोटो कतरिनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कतरिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर विकीबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेणारे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी समुद्रकिनारी एका यॉटमध्ये बसलेले दिसत आहेत. एका फोटोमध्ये विकीनं कतरिनाच्या मांडीमध्ये डोकं ठेवून पहुडलेला दिसत आहे. एका फोटोमध्ये कतरिना शांतपणे बसून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये सूर्यास्त होताना दिसत आहे. हा फोटो अतिशय सुंदर आहे.

कतरिनानं हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्यावर भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘खूप सुंदर दिसत आहात…’ तर आणखी एका युझरनं लिहिलं आहे,’तुम्ही दोघं एकत्र क्युट दिसत आहात…’ तर अनेक युझर्सनी या फोटोंवर हार्टचा इमोजी कॉमेन्टमध्ये शेअर केले आहेत.

दरम्यान, विकीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं तर तो लवकरच अश्वत्थामा, गोविंदा मेरा नाम या सिनेमांत दिसणार आहे. तर कतरिना टायगर ३, फोन भूतमध्ये दिसणार आहे. याशिवाय कतरिनाच्या (Kay Beauty)ब्रँडसाठी तिला बिझनेस आयकॉन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :


आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *