‘केजीएफ’ फेम अभिनेते मोहन जुनेजा यांचे निधन!

‘केजीएफ चॅप्‍टर 2’ फेम ( KGF Chapter 2 ) अभिनेते मोहन जुनेजा यांचे निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. आज सकाळी बंगळूर येथील खासगी रुग्‍णालयात त्‍यांनी अंतिम श्‍वास घेतला. त्‍यांच्‍या निधनामुळे कन्‍नड चित्रपटसृष्‍टीवर शोककळा पसरली आहे.

KGF Chapter 2 : कन्‍नडसह विविध भाषांमध्‍ये १०० हून अधिक चित्रपट
मोहन जुनेजा यांचे लहानपणापासून अभिनेता हाेण्‍याचे स्‍वप्‍न होतं. महाविद्‍यालयीन जीवनात त्‍यांनी नाटकातून आपली कारर्कीद सुरु केली. २००८ मध्‍ये कन्‍नड चित्रपट संगमामधून त्‍यांनी आपल्‍या चित्रपटातील करीअरला सुरुवात केली.

तामिळ चित्रपट टॅक्‍सीनंबरमध्‍ये त्‍यांच्‍या अभिनयाची चर्चा झाली. विनोदी अभिनेता म्‍हणून ‘चेतला’ चित्रपटातून त्‍यांची सर्वांना ओळख झाली. आजही या चित्रपटातील त्‍यांची भूमिका चाहत्‍यांच्‍या स्‍मरणात आहे. त्‍यांचे ‘नारद विजया’ नाटक चांगलेच गाजलं होते.

बहुचर्चित केजीएफ चित्रपटात त्‍यांनी पत्रकार आनंद यांना माहिती देणार्‍या पात्राची भूमिका केली होती. त्‍यांनी तामिळ, तेलुगू, मल्‍याळम आणि हिंदी आदी भाषांमधील १०० हून अधिक चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी काम केले. ‘केजीएफ’ पार्ट १ आणि दोनमध्‍येही त्‍यांनी भूमिका साकारली होती.

हेही वाचा :


नेटवर लपूनछपून काय पाहता याची माहिती सरकारला हवीय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *