भर पार्टीत करण जोहरकडून अभिनेत्रीला Kiss..!

निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यानं कायमच त्याच्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. इतकंच काय, तर करणनं या कलाजगतामध्ये अनेकांशी असणारं त्याचं मैत्रीचं नातंही जपलं आहे. पण, आता त्याचे असे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत जो पाहून ‘बेगानी शादी मे… ’ असंच नेटकरी म्हणत आहेत. (Karan johar)
करणनं (karan johar) आता काय नवं केलं, असंच काहींनी विचारलं आहे. यामागचं कारण असं की करण हा त्याच्या स्वभावामुळंही कायमच चर्चेत असतो.
यावेळी म्हणे त्यानं भर पार्टीत सर्वांसमोरच एका अभिनेत्रीला किस केलं आहे.
अगदी तारुण्यावस्थेपासून करण आणि या अभिनेत्रीची घट्ट मैत्री सर्वांनीच पाहिली. किंबहुना आता वयाच्या पन्नाशीकडे जात असतानाही त्यांची मैत्री आणखीच घट्ट झाल्याचं दिसून येत आहे.
ही अभिनेत्री आहे काजोल. मंगळवारी धर्मा प्रॉडक्शन्सच्या सीईओपदी असणाऱ्या अपूर्व मेहताच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी काजोलनं काळ्या रंगाच्या ड्रेसला पसंती दिली होती, तर करणनं हटके स्टाईल करत लाल रंगाच्या बाह्या असणाऱ्या एका आऊटफिटला पसंती दिली होती.
तिथं काजोल पार्टीसाठी आली आणि फोटोसाठी पोझ द्यायची म्हणून तिनं करणला फोन दिला… पुढे करणनं तिला सर्वांसमोरच गालावर किस केलं. बस्स…. मग काय हा क्षण फोटोंच्या रुपानं सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला.
करणनं किस केलं… असं म्हणत काजोल आणि त्याचा फोटो कमालीचा शेअर झाला. पार्टी कोणाची आणि चर्चेत येतंय कोण, हेच चित्र यावेळी इथं पाहायला मिळालं.
हेही वाचा :