सुपरस्टार सोडणार फिल्म इंडस्ट्री?अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा

lal singh chaddha

बॉलिवूडमधील (Bollywood) परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला (Aamir Khan) ओळखलं जातं. त्याने अनेक दमदार भूमिका साकारत आपली खास ओळख निर्माण केली आहे.(lal singh chaddha)
गेली अनेक दिवसांपासून आमिर खान चित्रपटांपासून दूर होता. मात्र आता लवकरच तो ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) मध्ये झळकणार आहे. या चित्रपटामुळे आमिर सतत चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्याने आपल्या करिअरबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

पाहूया आमिर नेमकं काय म्हणाला.. आमिर खान बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने पाहात असतात. बी टाऊनमधील प्रत्येक अभिनेत्री आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करते. . गेल्या अनेक वर्षांपासून आमिरने आपलं यश आपली लोकप्रियता तशीच टिकवून ठेवली आहे.

57 वर्षांच्या आमिर खानवर आजही अनेक तरुणी फिदा आहेत. इतकं सगळं असताना, आमिरने एक धक्कादायक खुलासा करत आपण चित्रपटांमधून कायमचा ब्रेक घेण्याचा विचार केला होता, असं सांगितलं आहे.

lal singh chaddha

आमिर खानने नुकतंच एबीपीला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला, ‘कोरोनाच्या काळात चित्रपटसृष्टीचा निरोप घेण्याचा निर्णय आपण घेतला होता याचा खुलासा त्याने केला आहे.

त्याने सांगितलं की, ‘गेल्या दोन वर्षांत त्याच्या कारकिर्दीत एक अशी वेळ आली, जेव्हा त्याने चित्रपट सोडण्याचा विचार केला. कारण त्याचा परिणाम त्याच्या खाजगी आयुष्यावर होत होता. तो म्हणाला की, ‘मी माझ्या कुटुंबाला याबद्दल सांगितलं होतं की, आता मला चित्रपटात काम करायचं नाही आणि चित्रपटांची निर्मितीदेखील करायची नाही आणि हे ऐकून कुटुंबाला धक्काच बसला होता’.(lal singh chaddha)

आमिर पुढं म्हणाला, ‘माझ्या मुलांनी आणि किरणने मला असं करण्यापासून थांबवलं. मी हे चुकीचं करत असल्याचं त्यांनी मला सांगितलं.

त्यांनी मला व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात बॅलन्स करायला सांगितलं. त्यांनतर मी माझा विचार बदलला. आणि आज परत चित्रपटांमध्ये येत आहे. एखादा चित्रपट फार काळ माझ्यामध्ये तसाच राहतो आणि त्यामुळे माझ्या रिअल लाईफमध्ये बरंच काही घडून गेलं.असं म्हणत आमिर खानने सर्वांनाच चकित केलं आहे.

हेही वाचा :


आज धोनीसारखी कमाल करणार का विराट?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *