तुमचं पॅन कार्ड हरवलंय? घाबरू नका, एका मिनिटांत मिळेल “ई-पॅन कार्ड’, जाणून घ्या

PAN card

कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कामासाठी पॅनकार्ड(PAN card) हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. काम बँक खाते उघडणे, कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड घेणे, पीएफ खात्यासाठी इत्यादी अनेक कामांसाठी त्याचा वापर महत्वाचा आहे.

त्याच बरोबर आर्थिक व्यवहारासाठीही ते महत्वाचे आहे. 50 हजारांहून अधिक व्यवहारांसाठी, आयकर विवरणपत्र भरण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक असते.

अनेकदा पॅन कार्ड हरवले किंवा चोरीलाही जाते. अशा परिस्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात की, त्याचा कोणी गैरवापर करू करेल का? आता त्यांना पॅनकार्ड(PAN card) कसे मिळणार? इत्यादी. पण अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पॅन कार्ड हरवल्यास, तुम्ही काही मिनिटांत तुमचे ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. हे पूर्णपणे वैध आहे. पुढील स्टेप फाॅलो करून तुम्ही ते सहज डाऊनलोड करू शकता..

जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर अशा परिस्थितीत पहिल्यांदा तुम्ही त्याची नोंदणी करून घ्यावी. यासोबतच तुम्ही ही माहिती पॅनकार्ड ऑफिसलाही देऊ शकता. याच्या मदतीने तुमच्या पॅनकार्डमधून(PAN card) काही चुकीची गोष्ट घडली तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. यानंतर तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता आणि नवीन पॅन कार्ड देखील मिळवू शकता.

तुम्ही ई-पॅन कार्ड घरी बसून डाउनलोड करू शकता:-

1) तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले किंवा हरवले असेल तर तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ला भेट द्यावी लागेल.

2) आता येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल, आणि नंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक देखील येथे भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीखही येथे टाकावी लागेल.

3) त्यानंतर तुम्हाला नियम आणि अटींवर क्लिक करावे लागेल आणि येथे तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकावा लागेल. या नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल, जो तुम्हाला इथे टाकावा लागेल.

4) आता ‘कन्फर्मेशन’ या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल, जे तुम्ही ऑनलाइनद्वारे करू शकता. पेमेंट केल्यानंतर, तुमच्या ई-पॅन कार्डची PDF डाउनलोड केली जाईल, ज्यामध्ये तुम्ही तुमची जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकून ते उघडू शकता.

Smart News:-

‘द्वेशाचं राजकारण’ प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण


गणेश नाईकांना सर्वात मोठा झटका, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला, आता कधीही अटक होणार


“मनसेचे हिंदूत्व लोकांना आवडतय; मुख्यमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज”


सव्वा 2 लाखाचा रत्नागिरी हापूस सलग चौथ्या दिवशी रेल्वे स्थानकावर पडूनच


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *