मधू चोप्रांनी शेअर केला गोव्यातील खास फोटो, जावई निक जोनस म्हणाला “सासूबाई…”

priyanka chopra

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला (priyanka chopra)ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांका ही सध्या मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रियांकाची आई डॉ. मधू चोप्रा या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियांका चोप्राची (priyanka chopra) आई मधू चोप्रा या इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. मधू चोप्रा या सध्या गोव्यात आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मधू चोप्रा यांनी वनपीस परिधान केला असून त्या एका रुममध्ये असल्याचे दिसत आहे. मधू चोप्रा यांनी या फोटोला हटके कॅप्शनही दिले आहे. ‘जेव्हा गोव्यात…’, असे कॅप्शन मधू चोप्रा यांनी दिले आहे. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

मधू चोप्रा यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र यात प्रियांकाचा पती आणि मधू चोप्रा यांचा जावई निक जोनसच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “सासूबाई…तुम्ही फार जबरदस्त दिसत आहात”, अशी कमेंट निकने केली आहे. निकच्या या कमेंटला अनेकांनी लाईक केले आहे. मधू चोप्रांच्या या फोटोवर प्रियांकाने मात्र काहीही कमेंट केलेली नाही.

दरम्यान प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती दिली. तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. “आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ अशी पोस्ट प्रियांकाने शेअर केली होती.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या आईला बाळाचे नाव काय ठेवले? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजून प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव ठेवलेले नाही. जेव्हा पंडित त्याच्या नावाचे अक्षर देतील, त्यानंतर नाव ठरवण्यात येईल, असे मधू चोप्रांनी सांगितले होते.

Smart News:-

हिंदी रिअ‍ॅलिटी शो जज करणार नाही सोनू निगम, जाणून घ्या असं का म्हणाला तो?


ब्लॉकबस्टर ‘पावनखिंड’ आता OTT वर पाहता येणार;


इचलकरंजीमध्ये महासत्ता चौकात मोठी दुर्घटना टळली..!


भाजपला राज्यात पुन्हा येऊ देणार नाही, शरद पवारांची गर्जना..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *