अपघातानंतर कशी आहे मलायकाची परिस्थिती?

car accident of malaika arora

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासाठी (Malaika Arora car accident) शनिवार 2 एप्रिलचा दिवस वाईट ठरला. अभिनेत्रीला अपघाताचा सामना करावा लागला आहे. शनिवारी अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाला असून (Malaika Arora accident) तिच्या कारला दुसऱ्या गाडीने धडक दिल्याची घटना घडली होती. ज्यामध्ये अभिनेत्री जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मलायका अरोरा अपघातात (car accident) जखमी झाल्याचे कळल्यानंतर तिचे चाहते काहीसे चिंतेत होते. मात्र तिची बहिण अमृता अरोरा हिने दिलेल्या माहितीनुसार, मलायकाची परिस्थिती सुधारत आहे. सुरुवातीपेक्षा तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे.

अमृता अरोरा असं म्हणाली की, ‘मलायकाची प्रकृती आता सुधारत आहे. काही वेळासाठी ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असणार आहे.’ याआधी अपोलो हॉस्पिटलकडून मलायकच्या प्रकृतीबाबत हेल्थ अपडेट जारी करण्यात आलं होतं. ज्यात असं म्हटलं होती की, ‘मलायकच्या कपाळावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. सिटीस्कॅनमध्ये सर्वकाही ठीक आहे, सध्या तिची तब्येत सुधारत आहे.

हा अपघाच झाला तेव्हा मलायका तिच्या रेंज रोव्हर गाडीमध्ये होती. दोन गाड्यांच्या मध्ये तिची गाडी अडकली आणि हा अपघात घडला. खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश कलसेकर यांनी सांगितलं, “आम्हाला तिन्ही कारचे रजिस्ट्रेशन नंबर मिळाले आहेत. कारमालकांशी संपर्क करून नेमकं काय घडलं याची माहिती घेतली जाईल. दुर्घटना कशी झाली, कुणाची चूक होती याचा तपास केल्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल”


हेही वाचा :


शरद पवार यांचं मोठं विधान; पण आघाडीसाठी…


पवारांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले


गायकवाडांची सूनबाई..! सायली संजीवचा फोटोशूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *