हृताची हनीमून डायरी, तुर्कीतून video viral

दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळे (marathi film) व्हेकेशन टूरला पती प्रतिकसोबत होती. तुर्कीतील अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले होते. या व्हिडीओत तुर्कीसारख्या देशात ती टाईम स्पेंड करताना दिसली होती. आता तिने एक नवी पोस्ट टाकून कामावर परतली असल्याचं त्यामध्ये म्हटलंय. यासोबतचं तिने साडीतील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप हृताने सोडली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत संसाराची गाठ बांधलीय.
मन उडू उडू झालं या मालिकेत हृताने उत्तम भूमिका साकारलीय. अभिनेत्री हृता बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिने तुर्कीतील दौऱ्याचे काही फोटोज आणि व्हिडीओज शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडतोय.
दरम्यान, तिने एक मेहंदीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये तिच्या हातावर मेहंदी काढताना दिसत आहे. तिच्या लग्नाच्या आधीचा हा व्हिडीओ आहे. याशिवाय तिने घागऱ्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. तिने घागरा कसा निवडला, त्याची डिझाईन कशी निवडली, यासंदर्भातील माहिती दिलीय.
टाईमपास ३ लवकरच
टाईमपास या मराठी (marathi film) चित्रपटांच्या सीरीजमध्ये तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हृताने आपल्या इन्स्टाग्रामवर टाईमपास ३ ची एक झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती फाईट करताना दिसलीय. या व्हिडिओला तिने कॅप्शन लिहिलीय की-
आई बाबा आणि साईबाबा शप्पथ…
आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात…
पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,
‘टाईमपास ३’ लवकरच….
अनन्या चित्रपट लवकरचं भेटीला
शिवाय अनन्या नावाचा तिचा एक चित्रपट येततोय. यामध्ये ती अनन्या देशमुख ही व्यक्तीरेखा साकारतेय. आज या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
हेही वाचा :