200 कोटींची पोटगी धुडकावणाऱ्या अभिनेत्रीची का होतेय इतकी चर्चा?

Samantha Ruth Prabhu

लग्नबंधनात अडकताना साता जन्मांची साथ (marital relationship) निभावण्याची वचनं एकमेकांना दिली जातात. काहींना जोडीदाराची अशी साथ मिळते, तर काहीजणांच्या नशिबबात मात्र वेगळीच वळणं लिहिलेली असतात. मग इथे तुमची श्रीमंती, प्रसिद्धी सारंकाही फिकं पडतं. जगण्यात इतकी हतबलता येते की त्यातून सावरावं कसं हाच प्रश्न उभा राहतो.

एका आघाडीच्या अभिनेत्रीला याच प्रसंगातून जावं लागलं होतं. काही वर्षांचं रिलेशनशिप आणि त्यानंतरचं (marital relationship) वैवाहिक नातं….. सारंकाही सुरळीत असतानाही या अभिनेत्रीला घटस्फोटाची झळ सोसावी लागली.

पतीपासून वेगळं होणं अर्थात तिच्यासाठी कठीण होतं, पण या लढाईत तिनं स्वबळावर स्वत:ला सावरण्याचा निर्णय घेतला. आता यातून ती बाहेरही पडताना दिसत आहे.

Samantha Ruth Prabhu

पण, कमालीची लोकप्रियता असल्यामुळं भूतकाळ काही तिची पाठ सोडताना दिसत नाही. ही अभिनेत्री आहे समंथा रुथ प्रभू.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी समंथाचं लग्न झालं होतं. त्यानंतर जे काही घडलं ते आता सर्वज्ञात आहे. असं म्हणतात की समंथानं 200 कोटी रुपयांची पोटगीही नाकारली होती.

हीच समंथा आता मोठ्या आत्मविश्वासानं पुन्हा एकदा कलाजगतामध्ये वावरु लागली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आली. (Samantha Ruth Prabhu)

हिरव्या रंगाचा शिमरी टेल गाऊन, मेसी टेल लूक आणि मिनीमल मेकअप असा एकंदर तिचा लूक होता. यावेळी समंथा मोठ्या आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर आली आणि तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या.

स्मितहास्याने समंथाने सर्वांच्या काळजाचा ठाव घेतला. तिचा हा नवा अंदाज सर्वांनाच इतका भावला की पाहता पाहता तिच्या या लूकचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

हेही वाचा :


हा फेसपॅक करणार त्वचेच्या सर्व समस्या छूमंतर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *