मिया खलिफाला Education Advisor बनवण्याची होतेय मागणी

अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफा नेहमीच तिच्या फोटो आणि लुकमुळे चर्चेत असते. आता पुन्हा (adult) एकदा मियाने मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे. इजिप्तमध्ये मिया खलिफाला शिक्षण सल्लागार बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटू शकतं. इजिप्तच्या शिक्षण संचालनालयाचे फेसबुक पेज हॅकरने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या पेजवर मिया खलिफाचा फोटो टाकण्यासोबतच तिला (adult) शिक्षण सल्लागार बनवण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण ऑगस्ट महिन्यातील आहे. इजिप्शियन वृत्तपत्र अल-मसरी अल-युमच्या वृत्तानुसार, बहरीन प्रांताच्या शिक्षण संचालनालयाचे फेसबुक पेज हॅक करण्यात आलं होतं.

या पेजवर मिया खलिफाचा फोटो टाकून डॉ.मिया खलिफाला शिक्षण सल्लागार बनवावं, अशी मागणी शिक्षणमंत्री डॉ.रेड्डी हेगाझी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, यानंतर बहरीनच्या शिक्षण विभागाकडून फेसबुक पेज हॅक केल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी तक्रार दाखल केल्याचंदेखील म्हटलं आहे.

हॅकर्सनी मिया खलिफाच्या नावासमोर डॉक्टरही जोडलं आहे. IMDB नुसार, मिया खलिफाने टेक्सास विद्यापीठातून इतिहासात पदवी घेतली आहे. मात्र तिच्या पुढील शिक्षणाबाबत कोणतीही माहिती नाही. मिया खलिफा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. इन्स्टाग्राम मियाचे 27 मिलियन फॉलोअर्स आहेत. या प्रकरणामुळे मिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Smart News :