बोनी कपूर यांच्या क्रेडिट कार्डमधून लाखोंची रक्कम लंपास!

बॉलीवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मोठी फसवणूक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या बँक (credit card) अकाऊंटमधून मोठी मोठ्या रकमेची चोरी झाली आहे.
प्रसिध्द निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून (credit card) जवळपास ३ लाख ८२ हजार रुपयांची चोरी झालीय. त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केलीय. मुंबईच्या अंबोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत तक्रार दाखल केलीय.
माहितीनुसार, बोनी कपूर यांना मार्च महिन्यात समजलं होतं की, त्यांच्या अकाऊंटमधून कुणीतरी पैसे काढले आहेत. ज्यावेळी त्यांनी बँकेतून माहिती मिळवली , तेव्हा त्यांना समजलं की, त्यांची फसवणूक झालीय.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बोनी कपूर यांनी कुणालीही आपल्या क्रेडिट कार्डची माहिती दिलेली नाही. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा फ्रॉडशी संबंधित फोन कॉल आला. अशा परिस्थितीत आता बोनी कपूरने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिलीय. बोनी यांच्या अकाऊंटचे पैसे गुरुग्रामच्या एका कंपनीच्या खात्यात गेले आहेत.
बोनी कपूर भारतीय सिनेजगतातील प्रसिध्द चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘नो एंट्री, जुदाई’, ‘वाँटेड’ यासारख्या हिट चित्रपटांचे निर्माते आहेत. त्यांनी हिंदी सिनेमामध्ये अनेक ॲवॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
हेही वाचा :