ऐश्वर्या रायचं 30 वर्ष जुनं फोटोशूट व्हायरल…मिळाले होते ‘इतके’ पैसे

जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असलेल्या (miss world) ऐश्वर्या रायचं 30 वर्ष जुनं फोटोशूट सोशल मीडियावर समोर आलंय. ऐश्वर्या रायचे हे फोटोशूट मिस वर्ल्ड होण्याआधीचे आहे, ज्यामध्ये तिचे चाहते तिला ओळखू शकत नाहीत.

अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड (miss world) ऐश्वर्या राय बच्चन सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते.

मात्र, आता ऐश्वर्याचे (miss world) असे काही जुने फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीला ओळखणे कठीण होत आहे.

ऐश्वर्या रायच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील मॉडेलिंग बिलाची एक प्रत सोशल मीडियावर समोर आली आहे. बिलावर 23 मे 1992 ही तारीख आहे, म्हणजेच मिस वर्ल्ड खिताब जिंकण्यापूर्वी जवळजवळ दोन वर्षे पूर्वीचं हे फोटोशूट आहे.

एका मासिकाच्या शूटिंगच्या कामाच्या बदल्यात अभिनेत्रीला 1,500 रुपये मिळाल्याचे यात दिसून आले आहे.

ऐश्वर्या त्यावेळी ‘सुमारे 18 वर्षांची’ होती, तिने कृपा क्रिएशन्स नावाच्या एका मॅगझिन कॅटलॉग शूटसाठी ‘मॉडेल म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली’. बिलाच्या तळाशी त्यांची स्वाक्षरी आहे आणि त्यात मुंबईत करार झाल्याचे नमूद केले आहे

विमल उपाध्याय नावाच्या ट्विटर यूझरने कॅटलॉग फोटो आणि मासिकाच्या मुखपृष्ठांसह मॅगझिन शूटमधील फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

ऐश्वर्या आणि सोनाली बेंद्रेचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांना त्यांच्या या 30 वर्ष जुन्या फोटोंवरून नजर हटवता येत नाहीये. या चित्रांमधील ऐश्वर्याला ओळखताही येत नाही.

हेही वाचा :


IPL 2022: नवे आहेत पण छावे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *