film industry: बॉलिवूडवर पुन्हा शोककळा..!

संगीत क्षेत्रातून पुन्हा एकदा दुःखद माहिती समोर आली आहे. ‘सावन को आने दो’, ‘कजरे की बाती’, ‘आँखों में बस हो तुम’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ आणि ‘रानी चेहरे वाले’ यांसारखी अनेक सदाबहार गाणी लिहिणाऱ्या गीतकार (Lyrisist) माया गोविंद यांचं आज निधन झालं आहे.(film industry)
त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 80 वर्षीय माया गोविंद यांनी आज राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. गीतकार माया गोविंद यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्येच नव्हे तर टीव्ही क्षेत्रातही शोककळा पसरली होती.(film industry)
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेन ब्लड क्लॉटिंगमुळे त्यांना जानेवारीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर काही दिवस उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात करण्यात आलं होतं. परंतु वयाच्या या टप्प्यात त्या आजारावर यशस्वी मात करू शकल्या नाहीत.
माया गोविंद यांच्यावर आज दुपारी पवन हंस स्मशानभूमी, विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे.
माया गोविंद यांचा मुलगा अजय गोविंद त्यांच्या तब्येतीची माहिती देत असत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीशी बोलताना त्यांच्या मुलाने सांगितलं होतं की, त्यांच्या आईला आधी फुफ्फुसात संसर्ग झाला होता आणि नंतर ब्रेन ब्लड क्लॉटिंग झालं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले होते.
हेही वाचा :