शाहरुखची मुलगी सुहानाच्या चित्रपटाचा टीझर लॉन्च! (Video)

बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा , शाहरुख खानची मुलगी सुहाना खान  आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. (movie teaser) हे तिघेही दिग्दर्शक झोया अख्तरच्या  ‘द आर्चीज’ (The Archies) या चित्रपटात दिसणार आहेत. खूप दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. प्रेक्षकही त्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे. झोया अख्तरने नेटफ्लिक्सवर या आगामी चित्रपटाशी संबंधित एक मजेदार किस्साही शेअर केला आहे. चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट व्हिडिओमध्ये पाहता येईल.

आर्चिसचा (the archies) फर्स्ट लुक
OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या नवीन स्टार्सच्या परिचयाचा व्हिडिओमध्ये अगस्त्य नंदा , सुहाना खान , खुशी कपूर  दिसत असून ते चित्रपटातील बाकीच्या तरुण स्टार्ससोबत मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सर्व तरुण सेलेब्स हसताना, उड्या मारताना आणि नाचताना दिसत आहेत. कोणी गिटार वाजवत आहेत तर कुणी सायकलवरून फिरत आहे. एकंदरीत सगळे मिळून पिकनिक एन्जॉय करत असल्याचा एक माहोल दिसत आहे.(movie teaser)

अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद
व्हिडिओमध्ये अभिनेता डॉट, मिहिर आहुजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्यासह अगस्त्य, सुहाना आणि खुशी आहेत. सर्व रेट्रो कपड्यांमध्ये दिसू आहेत. झोया अख्तरने सांगितले होते की ती तिच्या मूळ शैलीत द आर्चीज चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात मौजमजेसोबतच रहस्यही असणार आहे. तसे, अमिताभ बच्चन आपल्या नातवाच्या पदार्पणाने खूप खूश आहेत. त्यांनी अगस्त्य नंदा याचेही अभिनंदन केले आहे.

बच्चन यांनी द आर्चीज  चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले, ‘आणखी एक पहाट, माझा नातू. अगस्त्या तुला आशीर्वाद. तुझ्यावर प्रेम आहे. आठवणींमध्ये हरवायला तयार व्हा झोया अख्तरचा द आर्चीज हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे.’

 

‘या’ भूमिकांमध्ये स्टार किड्स दिसणार
सर्व स्टार किड्सनी त्यांच्या डेब्यू चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. अगस्त्य नंदा लाल केसांमध्ये दिसत आहे. त्याने आपले केस आर्ची प्रमाणे रंगवले आहेत. तर, खुशी कपूरने देखील तिची ‘बेटी’ची भूमिका वठवण्यासाठी तिचे केस कापून रंगवले आहेत. या चित्रपटात सुहाना खान वेरोनिका लॉजची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट खूपच मजेशीर असणार आहे, हे व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :


beating: पत्नीला भेटायला जाणं पडलं महागात…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *