हिंदीच नाही,तेलुगूतही जोरदार सुरू आहे ब्रह्मास्त्रची कमाई, तोडला धूम 3 चा रेकॉर्ड

Movies

Brahmastra: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र‘ (movies) सिनेमा ९ सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. सिनेमाला दमदार ओपनिंग मिळाले आहे. ब्रह्मास्त्रची पहिल्या दिवशीच भारतातली कमाई ३६ करोडहून अधिक झाली आहे. हिंदी व्हर्जनविषयी सिनेमाच्या बोलायचं झालं तर ३२ करोडहून अधिक कमाई झाली आहे. तर जगभरातील कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर ब्रह्मास्त्रचं ग्रॉस कलेक्शन ७५ करोड इतकं आहे. तर नेट कलेक्शन ६५ करोडच्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ओपनिंगलाच कलेक्शनचा मोठा आकडा पाहून लोक मात्र हैराण झाले आहेत,तसंच बॉक्स ऑफिसचे विद्यमान पंडीतही आपल्या अंदाजापेक्षा सिनेमानं अधिक कमाई केल्यामुळे थक्क झाले आहेत. रणबीर आणि आलियाच्या करिअरमधला ब्रह्मास्त्र सर्वात मोठी ओपनिंग देणारा सिनेमा (movies) बनला आहे. तर २०२२ मधला बॉलीवूडमधील ओपनिंगला सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून ब्रह्मास्त्रची नोंद झाली आहे. तसंच,ब्रह्मास्त्र कोणत्याही हॉलिडे सिझनमध्ये रिलीज न होता देखील अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये टॉपला गणला जात आहे.

 

 

Smart News:-