ब्ल्यू कलरच्या कोटमध्ये अप्सरेचा खास लूक व्हायरल!

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच (movies news) अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) काही दिवसांपुर्वी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील चंद्रा गाण्यावर ठेका धरला होता. या तिच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तर सध्या सोनाली ब्ल्यू कलरच्या कोटमधील फोटोशूटने चर्चेत आली आहे.

सोनालीने (Sonalee Kulkarni ) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर ब्ल्यू रंगाच्या कोट आणि पांढऱ्या आणि ब्लॅक रंगाच्या शर्टमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत सोनाली खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. यासोबत तिने पायात ब्लॅक रंगाचे शूज आणि डोळ्यावर चष्मा परिधान केला आहे. तर तिच्या मोकळ्या केसांनीसह मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोतील खास म्हणजे, सोनालीचा कोटमध्ये कातिलाना अंदाज पाहायला मिळतोय.(movies news)

 

याआधीही सोनालीने इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा ब्रालेट टॉप परिधान केल्याचे फोटो शेअर केले होते. यावेळी सोनालीने फोटोशूटवेळी किलर पोझ दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘पुरानी जीन्स 👖नवी आहे 🫣’. असे लिहिले आहे. फोटोमधील तिचा कातिलाना अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

याशिवाय सोनालीच्या इन्स्टावर ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनयासह सौंदर्याने चाहत्याना नेहमीच मंत्रमुग्ध करत असते. तिने अल्पावधीतच स्वत:ची अशी खास ओळख सिनेसृष्टीत निर्माण केली आहे. नुकताच तिचा ‘झिम्मा’ आणि ‘पांडू’ मराठी चित्रपट गाजला.

हेही वाचा :


सीरम थांबवणार ‘कोव्‍हिशील्‍ड’चे उत्‍पादन; काय आहे कारण…?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *