डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने जपला ‘हा’ मंत्र

आयुष्याच्या वळणावर प्रत्येकाला चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. चांगल्या गोष्टी जीवनात आनंद (happiness)घेऊन येतात, तर कही जीवनात असं काही घडतं त्याचा विचार देखील आपण करू शकत नाही. अशा परिस्थित कायम आपल्यासोबत कोणी तरी असावं, ज्याला आपण मनात होत असलेली गुंतागुतं सांगू शकू… सर्वसामान्य लोकांसोबत सेलिब्रिटींना देखील अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. सर्वांना आपल्या अभिनयाने आणि डान्सने घायाळ करणारी अभिनेत्री नुसरत भरूचाने(Nushrat Bharucha) देखील डिप्रेशनवर मात केली आहे.
चाहत्यांना कायम उत्साहात (happiness)दिसणाऱ्या नुसरतने 2019 साली डिप्रेशनबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं होतं. ती म्हणाली की कुटुंब आणि मित्रांचा आधार वाटणं महत्त्वाचे आहे. आज नुसरतच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून तिचा डिप्रेशन दरम्यानचा प्रवास…
नुसरतने तिच्या संघर्षाबद्दल आणि ती ज्या टप्प्यातून गेली त्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, ती म्हणाली, उद्या सर्व गोष्टी चांगल्या होतील यावर विश्वास ठेवणे… या मंत्राचा कायम जीवनात उपयोग केला पाहिजे.
डिप्रेशनबद्दल नुसरत म्हणाली, ‘मला असं वाटतं माझ्या आजू-बाजूचे लोक, मित्र, कुटुंब तुमच्या शांततेत शांतपणे तुमच्याबरोबर उपस्थित राहू शकतात. मला कायम वाटायचं मी यातून बाहेर येईल… जर तुम्ही असं करू शकत नसाल, तर फार कठीण आहे…’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला विश्वास होता आज नाही, तर उद्या गोष्टी नक्कीचं उत्तम होतील.. विश्वास याचं एका शब्दाने मला जगण्याची उमेद दिली…’ स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाच्या बळावर आज नुसरत बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे.
हेही वाचा :
अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला;
आयजीएमच्या नूतनीकरणाची आम.आवाडेंकडून पाहणी
इचलकरंजी: महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : वीज मीटरचा तुटवडा; ग्राहकांची लूट