ओ जी ….. नेहा कक्करनं बेडरुममधूनच मारली हाक; अन्….

neha kakkar

अतिशय कमी वयात मेहनतीच्या बळावर गायिका नेहा कक्कर (neha kakkar) हिनं कमालीची लोकप्रियता मिळवली. प्रचंड मेहनत घेत ती यशाच्या शिखरावर पोहोचली. गाण्याव्यतिरिक्त नेहा तिचा ड्रेसिंग सेन्स आणि व्यक्तीमत्वासाठीसुद्धा ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी नेहा कायमच चाहत्यांसाठी काही सुरेख फोटो पोस्ट करत असते. आता म्हणे तिनं थेट बेडरुममधले फोटो शेअर केले आहेत.

बेडवर पडल्या पडल्या हातात पुस्तक घेत कोणा एका ठिकाणी नजर रोखत नेहानं (neha kakkar) काही पोझ दिल्या आणि तिचे हे फोटो तुफान व्हायरल झाले.

गुड मॉर्निंग जी…. अजून बेडवरच आहात की ब्रेकफास्ट टेबलवर… ? असं कॅप्शन तिनं या फोटोंवर दिलं. नेहाचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचं पाणीच झालं.

neha kakkar

भरमसाट मेकअप नाही, डिझायनर कपडे नाहीत, तरीही तिच्या चेहऱ्यावर असणारं ते गोड हास्यच रुपाला चार चाँद लावणार होतं. परिणीती चोप्रा, टोनी कक्कर आणि अनेक सेलिब्रिटींनी नेहाच्या या फोटोंवर कमेंट केल्याचं पाहायला मिळालं.

पतीसोबतची नेहाची केमिस्ट्री सुपरहिट….

नेहा कक्करनं गायक रोहनप्रीत याच्याशी लग्न करत वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली होती. लग्नानंतर नेहा तिच्या खासगी आयुष्यामुळंही बरीच चर्चेत आली होती. रोहनप्रीतशी असणारं तिचं नातं कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं.

हेही वाचा :


‘आपला तो बाब्या, अन्…’,वाईन विक्रीवरून मुख्यमंत्री म्हणाले तरी काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *