पहिल्याच दिवशी ‘चंद्रमुखी’ची कमाई कोट्यवधींच्या घरात..!

आपल्या मोहमयी रूपाने, घायाळ अदांनी आणि बहारदार नृत्याने सर्वांनाच प्रेमात पाडणारी सौंदर्यवती ‘चंद्रा’ हिने खासदार दौलतराव देशमानेसोबतच प्रेक्षकांनाही वेड लावलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचे शोज हाऊसफुल जात असून आता पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच ‘चंद्रमुखी’ची (Chandramukhi) कमाई कोट्यवधींच्या घरात झाली आहे.

चित्रपटात चंद्राची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. प्रसाद ओक (chandramukhi) दिग्दर्शित हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. एक ध्येयधुरंदर विवाहित राजकारणी जो समाजात काही सकारात्मक बदल आणू पाहात आहे. तो मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा आणि बहारदार नृत्याने अनेकांना वेड लावणाऱ्या सौंदर्यवतीच्या म्हणजेच ‘चंद्रा’च्या प्रेमात पडतो. तेव्हा त्याच्या राजकीय कारकिर्दीवर होणारा परिणाम आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात येणारी वादळे प्रेक्षकांना या चित्रपटात पहायला मिळत आहे.

 

‘चंद्रमुखी’ने पहिल्या दिवशी 1.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ”ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली आहे. मात्र अमृता, मृण्मयी आदिनाथबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते. अमृताने ही भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवले आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. भाषेवर अभ्यास केला आहे. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली. तर आदिनाथनेही त्याची देहबोली, ध्येयधुरंदर, रुबाबदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मृण्मयीची भूमिकाही खूप महत्वपूर्ण आहे.”

हेही वाचा :


किरकोळ वादातून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *