उफ्फ! आलिया भट्टसाठी रणबीर कपूर झाला प्रोटेक्टिव..!

alia bhatt

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या यशानंतर रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. दोघेही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.दरम्यान या ‘ब्रह्मास्त्र’च्या राहिलेल्या भागाचं शूटिंग करण्यासाठी ते दोघे वाराणसीला गेलेल आहेत. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिच्यासाठी रणबीर कपूरचा प्रोटेक्टिव अंदाज पाहून चाहते त्यांच्या प्रेमात पडले आहेत. तो आलियाची काळजी घेताना दिसत आहे.

आलिया आणि रणबीरला मंगळवारी वाराणसीच्या घाटावर पाहिलं, रणबीरने पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर लाल शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम घातली होती, तर आलियाने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातलेला आहे. वाढत्या उन्हाळ्यापासून बचाव करण्याकरता आलियाच्या हातात एक पोर्टेबल पंखा देखील दिसत आहे. आलिया आणि रणबीर वाराणसीच्या घाटात फिरतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे. यात ते बोटीतून बाहेर येत असताना रणबीर तिच्या सोबत दिसत आहे आणि तो सतत लक्ष ठेवत आहे की आलिया ठीक आहे का नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून चाहते रणबीर आणि आलियाच्या प्रेमात पडले आहेत.

alia bhatt

‘ब्रह्मास्त्र’ हा आलिया आणि रणबीर दोघांचा पहिला एकत्र चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया ईशाच्या भूमिकेत आहे आणि रणबीरने शिवाची भूमिका साकारली आहे. यात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्या आठवड्यात, आलियाच्या २९ व्या वाढदिवसानिमित्त, तिची ईशा म्हणून ओळख करून देणारा एक छोटा टीझर रिलीज केला. ३१ सेकंदाच्या टीझरच्या सुरुवातीला आपल्याला भेटतात आलिया आणि रणबीरचे ईशा आणि शिव. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं असून चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होणार. हा चित्रपट हिंदीशिवाय तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होईल. तर याचा दुसरा आणि तिसरा भाग २०२४ आणि २०२६ मध्ये येणार आहे.

 

 

हेही वाचा :


अभिनेत्याच्या पत्नीचा स्विमिंग लूक पाहून भल्याभल्या अभिनेत्रींना विसराल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *