पप्पी दे पप्पी दे..म्हणणं अभिनेत्रीला पडलं महागात, पडला जोराचा मार.

बिग बॉस मराठी’च्या हे पहिल्या सीझनमधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. ‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्मिता सोशल मीडियावर(social media) प्रचंड सक्रीय असते. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.
नुकताच स्मितानं पप्पी दे…पप्पी दे… पारुला..असं म्हणत एक व्हि़डिओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला चक्क मार खावा लागला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) प्रचंड व्हायरल होत आहे.
स्मिता गोंदकरनं इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिचं गाणं पप्पी दे…पप्पी दे… पारुला..असं म्हणताना दिसत आहे. सोबत तिची आई देखील आहे. तिची आईसमोर ती प्पीची डिमांड करत आहे. पहिल्यांदा तिची आई तिला मायेनं पप्पी देते मात्र दुसऱ्यांदा तिला जबरदस्त मारते.
स्मितानं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं देखील आहे की, खरचं जोराचा मार पडला..तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, आई शेवटी आई असते..सॅल्यूट तुझ्या आईला.. तर आणखी एकानं म्हटलं आहे की,द पारू गर्ल रॉक…तर एकानं म्हटलं आहे की, तुझी आई खूप छान आहे. बिग बॉस मराठीच्या घऱात किती छान बोलली होती. अनेकांनी कमेंट करत आई आणि मुलीच्या बॉन्डिंगचं कौतुक केलं आहे.