राखी सावंतला बॉयफ्रेंडने भेट दिली BMW आणि दुबईत घर, पण …!

bollywood news

बॉलिवूड (bollywood news) ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राखी आता आदिल खान दुर्रानीसोबत (Aadil Khan Durrani) आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत आहे. आदिलने आपल्या आयुष्यात पुन्हा आनंद आणल्याचं राखी सांगतेय. रोशिना देलावरी नावाच्या मुलीने राखीला फोन करून तिच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा तिची उद्योगपती असणाऱ्या आदिलसोबत ओळख झाली. आणि ही ओळख आता प्रेमात बदलली आहे. राखीने नुकतंच एका मुलाखती दरम्यान आपला बॉयफ्रेंड (Boyfreind) आदिल आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड रोशिनाबाबत अनेक खुलासे केले आहेत.

राखी सावंत (bollywood news)सध्या आपल्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आलीये. राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड आहे आदिल खान दुर्रानी. हा आदिल खान दुर्रानी सध्या दुबईत आहे. याठिकाणी दोघेही दर्जेदार वेळ घालवत आहेत. विशेष म्हणजे राखीसाठी आदिलने दुबईत घर घेतलं आहे. यापूर्वी त्याने तिला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. या दोघांनी टाइम्सला एक फोनेटिक मुलाखत दिली. ज्यामध्ये आदिलने राखीजवळ एका गोष्टीची मागणी केली आहे.

राखीने या मुलाखतीत खुलासा केला की, ‘आदिल आणि ती दोघेही सध्या दुबईत आहेत. आदिलने राखीला आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दुबईला नेलं आहे. आदिलने सांगितले की, त्यांच्या नात्याची ही एक छोटीशी सुरुवात आहे. राखीच्या बॉयफ्रेंडने पुढे सांगितले की, ‘तो बंगळुरूमध्ये सेटल झाला आहे आणि राखीसोबत मुंबईत डान्स अकॅडमी सुरु करण्याचा त्याचा विचार करत आहे.

रोशिनाबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘रोशिनाने मला फोन केला तेव्हा मी खूप रडले. पण आज मी दुबईत आहे आणि खूप छान वाटत आहे. आदिल खूप चांगला मुलगा आहे. त्याचवेळी आदिलला रोशिनाबद्दल विचारले असता, ती आपली एक्स गर्लफ्रेंड असल्याचा दावा त्याने केला. आता दोघांचाही संबंध नाही. राखीला तिच्या फोनमुळे त्रास होऊ नये म्हणून आदिलने तिला रोशिनाचा नंबर ब्लॉक करण्यास सांगितले आहे.

राखीकडून काय हवंय? या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला की, ‘मला तिच्या कामात कोणतीही अडचण नाही. पण फक्त तिने कमी ग्लॅमरस कपडे घालावे. तिने असे कपडे निवडले पाहिजेत, ज्याने आपले शरीर झाकले जाईल.सोबतच आदिलने राखीचे कौतुकदेखील केले. राखीची इमेज टीव्हीवर किंवा माध्यमांत कशीही असो, पण खऱ्या आयुष्यात ती त्याच्या विरुद्ध आहे. ती खूप साधी आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. तिचा आनंदी स्वभाव आहे. ती प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद घेते.

हेही वाचा:


फेसबुकमध्ये मोठा बदल : पोस्ट कुणाला दिसावी हे तुम्हीच ठरवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *