परिणीती चोप्राचं छुपं कौशल्य ;सारखा पाहिला जातोय ‘हा’ व्हिडीओ!

आपल्या अभिनयासोबतच गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे परिणीती (parineeti) चोप्रा. परिणीतीने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याचवेळी परिणीतीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लता मंगेशकर यांचे गाणे गाताना दिसत आहे.
सर्वजण परिणीतीच्या (parineeti) मधुर आवाजाचे कौतुक करत आहेत. इतकंच नाही तर ‘हुनरबाज’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या परिणीतीचा आवाज ऐकून सगळेच भावूक झाले.
परिणीती चोप्राने हुनरबाजच्या सेटवर लता मंगेशकर यांचे ‘लग जा गले’ हे लोकप्रिय गाणे गायले. परिणीतीचा आवाज ऐकून शोचे जज करण जोहर आणि मिथुन चक्रवर्ती यांचे डोळे पाणावले. परिणीतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचे चाहते तिच्या आवाजाचे कौतुक करत आहेत.
हुनरबाज’च्या ग्रँड फिनालेमध्ये नीतू कपूरही उपस्थित होती, ज्याने परिणीतीचा आवाज ऐकून नाचायला सुरुवात केली. परिणीती चोप्रा अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे, पण जज म्हणून ती पहिल्यांदाच एका रियालिटी शोमध्ये दिसली.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, परिणीती चोप्रा 2021 मध्ये ‘सायना’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती लवकरच रिभू दासगुप्ताच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
हेही वाचा :