Pathaan Trailer : गाण्यांपेक्षा ट्रेलर दमदार; अवघ्या काही मिनिटातच पार केले लाखो व्ह्यूज

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘पठान’चा ट्रेलर (Pathaan Trailer ) अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहमच्या अभिनयाचा आणि ॲक्शनचा मिलाप चाहत्यांना अनुभवता येणार आहे. शाहरुख आणि दीपिका या दोघांची ही केमिस्ट्री आधी गाण्यातूनही दिसली आणि आता ट्रेलरमधूनही दिसून येत आहे. उत्तम VFX तंत्रज्ञानामुळे ‘पठान’चा ट्रेलर आणखीच आकर्षक दिसून येत आहे. आशुतोष राणा, डिंपल कपाडिया अशा कलाकारांची सिनेमात विशेष भूमिका दिसत आहे.

बराच काळ प्रेक्षकांचा उत्साह वाढवल्यानंतर निर्मात्यांनी अखेर मंगळवारी चित्रपटाचा दमदार आणि जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला  आहे. चित्रपटाच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरुन सर्वत्र बराच वाद झाला होता. सेन्सॉर बोर्डाने काही सीन्स काढून टाकल्यानंतर चित्रपटाला यूए प्रमाणपत्र मिळाले.

२५ जानेवारीला ‘पठान’ संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. (Pathaan Trailer ) यशराज बॅनर अंतर्गत बनलेल्या ‘पठान’मध्ये शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने पेलली आहे.’पठान’ हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चार वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर शाहरुख खान रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

अँक्शन आणि रोमान्सने ‘पठान’ चा ट्रेलर व्यापून टाकला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळत आहे. या दोघांशिवाय जॉन अब्राहम विलनच्या भूमिकेत असून त्याचाही लूक या ट्रेलरमधून दिसत आहे. चित्रपटात एकूणच रोमान्स, कॉमेडी, ॲक्शन असा संपूर्ण मसाला ‘पठान’च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरची उत्सुकता सर्वांनाच असल्याने अल्पावधीतच लाखोंचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा :