एका अपघातानं बदललं लोकप्रिय अभिनेत्रीचं रुप..!

अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि अचानक त्या गायबही झाल्या. त्यापैकीच एक म्हणजे (popular) अनु अग्रवाल जी एकेकाळी आशिकी गर्ल म्हणून ओळखली जात होती. अनुने वयाच्या २१ व्या वर्षी आशिकी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाद्वारे अनु रातोरात स्टार बनली आणि तिला आशिकी गर्लचा टॅग देण्यात आला. तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोकं तिच्या घराबाहेर तासंतास उभे असत.

अनु तिच्या बॉलिवूडमधील (popular) भविष्यासाठी खूप उज्ज्वल होती, मात्र नंतर तिच्या आयुष्याला असं वळण मिळालं, ज्याने तिचं आयुष्यच पुर्णपणे बदलून गेलं. 1999 मध्ये अनुचा एक मोठा अपघात झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की, अनुला खूप गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर ती कोमात गेली. अनुला जगणंही कठीण झालं  आणि तिला 29 दिवस आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर ती जेव्हा शुद्धीवर आली होती तेव्हा तिची स्मरणशक्ती गेली होती.

 

चार वर्षांच्या उपचारानंतर अनुच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली आणि तिची स्मरणशक्ती परत येवू लागली. या अपघातानंतर अनु बॉलीवूडमध्ये परत येऊ शकली नाही कारण तिचा चेहरा खूप बदलला होता.

popular

त्यानंतर अनुने अध्यात्माचा आधार घेतला आणि ती योगशिक्षिका बनली. तिला स्वतः योगाचा खूप फायदा झाला आणि मग तिने गरीब मुलांनाही योग शिकवायला सुरुवात केली. 2001 मध्ये अनुने संन्यास घेतला आणि ती अजूनही झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना मोफत योगा शिकवते.

हेही वाचा :


कोल्हापूर : पंचगंगा बनली विषगंगा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *