अथांग समुद्राच्या साक्षीनं लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा…

लगीनघाईच्या या वातावरणामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं जोडीदारावर प्रेम व्यक्त करत त्याला जगासमोर आणलं आहे. बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या अभिनेत्रीनं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी (engagement) साखरपुडा करत तिनं सर्वांना थक्क केलं.
निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर या दोघांचाही शुभ्र कपड्यांमधला लूक अतिशय सुरेख दिसत आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं नात्याला नवं वळण देणारी ही जोडी आहे, ‘देवों के देव महादेव’ फेम अभिनेत्री सोनारिका भदौरिया आणि तिचा होणारा नवरा विकास पराशर.विकासचं आपल्यावर असणारं प्रेम, त्याची साथ आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे या सर्व भावना तिनं शब्दांवाटे व्यक्त केलं.(engagement)
‘मोठं मन असणाऱ्या या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी सतत काळजी घेतो तो हा मुलगा… माझ्यासाठी थरार म्हणजे हा मुलगा… माझ्यासमोर कायम खंबीरपणे उभा राहतो आणि प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी मलाच निवडतो असा हा मुलगा… मला संपूर्ण जगासमोर भरभरून प्रेम करतो, माझ्यावर विश्वास ठेवतो, मला पाठिंबा देतो, माझ्या मनात ज्यानं घर केलं आहे तो हा मुलगा….’, असं तिनं इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं.
सोनारिकानं सोशल मीडियावर हे फोटो विकासच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेअर करत ही गुडन्यूज दिली. ज्यानंतर तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी शुभेच्छांची रांग लावली.
चाहतेही सोनारिकाचे हे फोटो पाहून थक्कच झाले आणि लगेचच त्यांनीही तिच्यावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सोनारिकानं तिच्या खासगी आयुष्यात गाठलेलं हे स्थान सध्या कमाल उत्साहपूर्ण आणि तितकंच हेवा वाटेल असं आहे.
हेही वाचा :