लोकप्रिय अभिनेत्रीची आत्महत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

बंगाली टीव्ही विश्वातून एक दुखद आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगाली टीव्ही विश्वातील (Actress Suicide) लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्री पल्लवी डे हिचा मृत्यू झाला आहे.
पल्लवीने राहत्या घरात गळफास घेऊन (Actress Suicide) आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आज रविवारी ( 15 मे रोजी) सकाळी पल्लवीचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. घटनास्थळावर पोलीस पोहोचले त्यावेळी पल्लवी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती.
त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
अभिनेत्री पल्लवी डे च्या अभिनया प्रवासाबद्दल थोडसं.. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे ‘मन माने ना’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकरत होती. पल्लवीच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर तिला ‘Resham Jhanpi’ या टीव्ही शोमुळे खरी लोकप्रियता मिळाली. पल्लवीच्या जाण्यामुळं तिच्या चाहत्यांना धक्क बसला आहे. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.
हेही वाचा :