‘शेर शिवराज’चा दमदार ट्रेलर एकदा पाहाच….! Video

महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सर्व पाहून इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा भास उपस्थितांना झाला. निमित्त होते ‘शेर शिवराज’  चित्रपटाच्या ट्रेलर (trailer) अनावरण सोहळ्याचे. अफजलखानाचा कपटी डाव महाराजांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावरच कसा उलटवला याची छोटीशी झलक उपस्थितांना रंगमंचावर प्रत्यक्ष पहायला मिळाली.

या ट्रेलर (trailer) अनावरणप्रसंगी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाचे निर्माते नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे यांचे आभार व्यक्त केले.

चित्रपटाच्या संगीताविषयी संगीतकार देवदत्त बाजी, गायक अवधूत गांधी, जुईली जोगळेकर यांनी सुरेल झलक सादर केली. चित्रपटाविषयीचे अनुभव आणि आपल्या भूमिकेचे नानाविध पैलू मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, विक्रम गायकवाड या कलाकारांनी याप्रसंगी उलगडले.

किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. ‘गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे.

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफज़ल खानाच्या रुपात मुकेश ऋषी दिसणार आहे. मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर, ईशा केसकर, रिशी सक्सेना अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.

हेही वाचा :


CSK चे 14 कोटींचे नुकसान, ‘या’ खेळाडूमुळे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *