Prabhas चा बिग बजेट सिनेमा लीक….

prabhas new movie

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे स्टारर ‘राधे-श्याम’ (Radhe Shyam) बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाली आहे. चाहत्यांना या जोडीच्या नव्याकोऱ्या सिनेमाची (prabhas new movie) प्रतीक्षा होती. पण सिनेमा रीलीज होताच निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. निर्मात्यांचं मोठं नुकसान यामुळे होत आहे.

राधे-श्यामसाठी प्रेक्षक उत्सुक होते. या सिनेमातील गाणी देखील हिट ठरत होती. चाहत्यांना हा सिनेमा (prabhas new movie) बघण्यासाठी असलेला हा उत्साह पायरेटेड कंटेट पुरवणाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे. तमिलरॉकर्स (Tamilrockers Leaked Radhe Shyam) कडून हा सिनेमा इंटरनेटवर लीक करण्यात आला आहे. तमिलरॉकर्स हे अशाच प्रकारच्या कंटेटसाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून बॉलिवूड असो वा दाक्षिणात्य अशाप्रकारचे चित्रपट लीक केले जाता. मेकर्सना मात्र या गोष्टीमुळे नुकसान सहन करावे लागत आहे.

प्रभास-पूजाच्या या सिनेमाला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात रोमान्स आणि थ्रीलर दोन्ही पाहायला मिळणार आहे. अॅस्ट्रो-थ्रीलर अशा प्रकारात मोडणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेंड ट्विटरवर देखील पाहायला मिळत आहे. अनेकांनी ट्वीट करत सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघत असल्याचे म्हटले आहे.

प्रभासच्या या सिनेमाची प्रतीक्षा चाहत्यांना या ही करता होती, कारण याआधीच्या सिनेमात अभिनेत्याची हवी तशी जादू पाहायला मिळाली नव्हती. ‘राधे-श्याम’ आधी प्रभास ‘साहो’ या चित्रपटात दिसला होता. त्यापूर्वी प्रभासच्या ‘बाहुबली’ सिनेमा सीरिजने अनेक रेकॉर्ड केले होते. केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरात या सिनेमाची वाहवा झाली.


हेही वाचा :


“फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात..!


युक्रेनवरचा धोका वाढला, रशियाकडून मिसाईलचा पाऊस


कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात राज्यपालांचा तीव्र निषेध..!


“फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *