प्रगती एक्सप्रेसचा विस्टाडोम कोचद्वारे प्रवास सुरू

Pragati Express

मुंबई ते पुणे मार्गावरील तिसर्‍या विस्टाडोम कोचची सुरूवात सोमवारी ‘प्रगती एक्सप्रेस’द्वारे(Pragati Express) झाली. या मार्गावरील डेक्कन आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेसला याआधी हे पारदर्शक छताचे डब्बे जोडण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे, मुंबई – पुणे मार्गावरील तिसरा विस्टाडोम कोच ट्रेन क्र. 12125/12126 प्रगती एक्स्प्रेसला(Pragati Express) जोडण्यात आला असून आज सकाळी पुण्याहून सीएसएमटीला तर संध्याकाळी पुन्हा मुंबईहून पुण्याला ही ट्रेन रवाना करण्यात आली.

प्रगती एक्स्प्रेसच्या(Pragati Express) प्रवाशांना माथेरान टेकडीची दुसरी बाजू पाहण्याचा संधी मिळणार आहे. कारण ही ट्रेन परतीच्या प्रवासात कर्जत – पनवेल मार्गे मुंबईला येणार आहे. त्यामुळे निसर्गरम्य पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासोबतच सोनगीर टेकडी (पळसधरीजवळ), उल्हास नदी (जांब्रुंग जवळ), उल्हास व्हॅली, खंडाळा, लोणावळा इत्यादी भाग आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील धबधबे, बोगदे यांचा आनंद प्रवाशांना घेता येत आहे.

या विस्टाडोम कोचमध्ये, काचेचे छत असण्यासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरणारी सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे इत्यादी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय स्पेशल व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा उपलब्ध आहे.

Smart News:-

मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, मुहूर्तही ठरला, शिंदेंच्या आमदाराने दिली Update


हायवेवर एसटी चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते थरारक


एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? अजित पवारांचा कडाडून हल्लाबोल


सराव थांबवला, प्रशिक्षकांना घरी पाठवले, भारताच्या ऑलिम्पिकपदक विजेतीचा राष्ट्रकुलपूर्वी छळ


Leave a Reply

Your email address will not be published.