गरोदर असतानाच लोकप्रिय गायिकेचा बॉयफ्रेंडकडून विश्वासघात!

हॉलिवूडची प्रसिद्ध पॉपस्टार रिहाना तिचा प्रेग्नेंसी पीरियड (pregnancy period) खूप एन्जॉय करत आहे. जेव्हापासून तिने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. तेव्हापासून ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करतान तिचा बोल्ड आणि सिझलिंग लुक दाखवत आहे. गेल्या काही काळापासून ती तिच्या सेक्सी आणि बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटमुळे लाइमलाइटचा भाग बनली आहे. मात्र आता समोर आलेल्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसत आहे.

रिहाना पुन्हा एकदा चर्चेत
रिहाना (pregnancy period) आणि रॉकीचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सतत येत आहेत. दोघांचेही मार्ग वेगळे झाल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर एका यूजरने दावा केला आहे की, हे स्टार कपल आता वेगळं झालं आहे आणि त्यांच्या विभक्त होण्याचं कारण रॉकीने रिहानाची केलेली फसवणूक आहे.

रॉकीने रिहानाची फसवणूक केली का?
इतकंच नाही तर रॉकीचं अमीना मुअद्दी नावाच्या फुटवेअर डिझायनरसोबत अफेअर असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. जेव्हा रिहानाला या फसवणुकीची माहिती मिळाली तेव्हा तिने रॉकीसोबतचं नातं संपवलं. युजरने सांगितलं की, लॉस एंजेलिसमधील क्रेग्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये रिहाना आणि रॉकी भांडताना दिसले.

जेव्हा रिहानाला रॉकी आणि अमिना यांच्या नात्याबद्दल कळतं तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. रेस्टॉरंटमध्ये अमीना आणि रॉकीला रिहानाने रंगे हात पकडलं आणि ती रडू लागली. यानंतर तिने रॉकीसोबतचे नातं संपुष्टात आणलं आणि नंतर रेस्टॉरंटच्या मागील दाराने ती निघून गेली. रिहाना रॉकीच्या पहिल्या मुलाची आई होणार आहे. मात्र, या अफवांवर रिहानाने अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा :


IPLच्या नादात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा ‘THE END’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *