व्हाईट कलरच्या शर्टमध्ये बोल्ड झाली प्रिया बापट…

मराठमोळी सौंदर्यवती (beauty) प्रिया बापट हिने आपल्या अदाकारीने सर्वांनाच वेड लावलं आहे. आताही तिने आपल्या नव्या फोटोशूटमुळे सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतल्या आहेत. प्रियाचे व्हाईट शर्टमधील खास फोटोशूट व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये प्रिया बापट (Priya) बोल्ड दिसतेय. तिने हे फोटोशूट इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत.
नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये तिने काम केले आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनय़ाची छाप पाडून तिने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत. प्रिया बापट (beauty) ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीसोबतच तिने हिंदी चित्रपट आणि वेबसीरीजमध्येही तितक्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत.