या कारणामुळे अजूनही प्रियांका आणि निकनं लेकीचं केलं नाही बारसं!

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी काही दिवसांपूर्वी सरोगसी (surrogacy) तंत्रज्ञानाद्वारे मुलीला जन्म दिला आहे. प्रियांकानं स्वतः ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली होती. प्रियांका आणि निकच्या मुलीचा जन्म होऊन आता दोन महिने झाले आहेत. परंतु या दोघांनी त्यांच्या लेकीचं अद्याप बारसं केलेलं नाही. त्यामागचं कारण आता समोर आलं आहे.

या कारणामुळे लेकीचं बारसं केलं नाही

एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार प्रियांका आणि निक यांना (surrogacy) मुलगी होऊन आता दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. परंतु अद्याप या दोघांनी त्यांच्या लेकीचं नाव ठेवलेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी त्यांच्या लेकीचं नाव काय ठेवायचं यावर खूप विचार केला. परंतु अद्याप त्यांच्या मनाला भावेल असं नाव मिळालेलं नाही. प्रियांका आणि निकाला त्यांच्या मुलीचं नाव ठेवायची काहीच घाई नाही. कारण त्यांना लेकीसाठी अत्यंत वेगळं आणि अर्थपूर्ण नाव हवं आहे. सूत्रांनी असंही सांगितलं की, प्रियांकाला तिच्या मूळाशी संबंधित आणि निकच्या संस्कृतीचं प्रतिक असलेलं असं नाव हवं आहे. दोन भिन्न संस्कृतीचं प्रतिक असलेलं असं नाव ते दोघं शोधत आहेत. त्यामुळेच त्यांना खूप वेळ लागत आहे.

अद्याप नातीला मधु चोप्रांनी पाहिलं नाही

ई टाइम्सला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी सांगितलं की, त्या अद्याप नातीला भेटलेल्या नाहीत. प्रियांकानं तिच्या आय़ुष्यात आलेला हा बदल कसा स्वीकारला आहे, याबद्दल त्यांनी सांगितलं की, ती कुटुंबाबरोबर अतिशय आनंदात आहे. तिच्या आयुष्यात आलेल्या बदलामुळे ते सर्वजण खूश आहेत. लवकरच मी तिच्याकडे जाईन तेव्हा दोघींना मी प्रत्यक्ष बघीन आणि त्या कशा आहेत ते सांगीन.

मधु चोप्रा आहेत खूप आनंदात

प्रियांका, निक त्यांच्या बाळाला घेऊन भारतात कधी येणार असा प्रश्न मधु यांना विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं की, ‘मला तर कायम वाटतं की त्यांनी इथं यावं. हा देशही त्यांचाच आहे.’ आजी झाल्याचा आनंद मधु यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यांनी या मुलाखतीमध्ये असंही सांगितलं होतं की, या दिवसाची मी आतुरतेनं वाट बघत होती. आता तो दिवस माझ्या आयुष्यात आल्याचा खूप आनंद आहे. त्यांनी पुढं असंही सांगितलं की,’ आता तर मला प्रियांका आणि माझ्या मुलाची आठवण येत नाही. मी तर सतत माझ्या चिमुकल्या नातीचाच विचार करत आहे. ‘

हेही वाचा :


‘… तर किरीट सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू’;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *