जी ले जरा! प्रियांका चोप्राची मैत्रिणींसोबत धम्माल , Video Viral

priyanka chopra

बाॅलिवूडनंतर आता हाॅलिवूडमध्ये प्रियांका चोप्रा(priyanka chopra) धमाल करताना दिसत आहे. भले ती भारतात नसली, तरी नेहमीच चर्चेत असते. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिच्या फॅन्सना रोजचे अपडेट्स देत असते. सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात, याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते. आता प्रियांका चोप्रा सध्या बाळाच्या संगोपनात बिझी असली, तरीही ती स्वत:साठी वेळ काढतेच. आपल्या मैत्रिणींबरोबरचे तिचे धमाल करतानाचे फोटो तिनं इन्स्टावर शेअर केले आहेत.

प्रियांका(priyanka chopra) या फोटोंमध्ये तिच्या मैत्रिणींबरोबर वाॅकला निघाली असं दिसत आहे. तिच्याबरोबर तिचा लाडका कुत्राही आहे. या सगळ्या मैत्रिणी रस्त्यावरही छान गमतीजमती करत आहेत. प्रियांकाही मैत्रिणी आणि कुत्रे घेऊन आनंदात दिसतेय. त्यानंतर एका फोटोत प्रियांका कोरियन बारबेक्यू एंजाॅय करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत प्रियांका लिहिलं आहे, मुलींबरोबर एक गमतीदार रविवार आणि सोबत लाडके कुत्रे.

फोटोप्रमाणे तिनं मैत्रिणींबरोबर जेवतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात सगळ्या जणी धमाल मूडमध्ये आहेत. खरोखर सगळ्या जणी आनंदात पाहून छान वाटतंय.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे आईबाबा झाले. त्यांनी बाळाबद्दल काही शेअर केलं नाही अजून. कामाबद्दल सांगायचं झालं तर प्रियांका चोप्राचा ‘टेक्सट फॉर यू’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. तिनं सिएना मिलरबरोबर ‘द सीक्रेट डॉटर’ साइन केला आहे. बाॅलिवूडमध्येही प्रियांका फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली ‘जी ले जरा’ सिनेमा करणार आहे. तिच्या सोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफही असेल.

हेही वाचा :


पवारांच्या घरावरील हल्ल्यात सहभागी असणारे कर्मचारी होणार बडतर्फ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *