मुलीनंतर दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी निक प्रियांका सज्ज

priyanka chopra nick jonas

प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं आहे.  हे कपल दुस-या मुलाची तयारी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रियांका आणि निक दोघंही भाऊ-बहिणीचं महत्त्व मानतात आणि त्यांची मुलगी मालती मेरीसाठीही त्यांची हीच इच्छा आहे. मात्र, यासाठी ते  याची घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. या स्टार जोडप्याला भरपूर मुलं हवी आहेत.

वयाचा फरक नकोय
एका रिपोर्टनुसार, सूत्राने न्यूज पोर्टलला पुढे सांगितलं आहे की, निकला (priyanka chopra nick jonas) त्यांच्या मुलांमध्ये वयाचं जास्त अंतर नसावं अशी इच्छा आहे. त्यांच्या मुलांनी त्यांचे भाऊ केविन जोनास आणि जो जोनास यांच्या वयाच्या जवळ असावं अशी त्यांची इच्छा आहे. कथितरित्या जोनास बंधूंना त्यांची मुलं सख्या भावंडांसारखीच हवी आहेत आणि त्यांना चुलत भाऊ किंवा चुलत बहिणी अशा भावंडांसारखी नको आहेत. त्यांचे पालकही त्यांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

 Smart News :


पाच राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना ठरेल शुभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *