पंजाबी कुडी Shehnaz Gill मराठी बोलते तेव्हा दिसते आणखी क्यूट..!

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री (shehnaaz kaur gill) शेहनाज गिल यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांची मैत्री झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘बिग बॉस’ शो संपल्यानंतर देखील कायम दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सिद्धार्थ-शहनाजने चाहत्यांना कपल गोल्स दिली. दोघे लग्न कधी करणार असे प्रश्न देखील चाहते विचारत होते.

पण एक दिवस असा आला, ज्यामुळे सगळं काही संपलं. गेल्यावर्षी सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर (shehnaaz kaur gill) शहनाज पूर्णपणे कोलमडली. सिद्धार्थच्या निधनानंतर ती कित्येक दिवस शुटिंग आणि सोशल मीडियापासून दूर होती.

पण आता शहनाजने जोरदार कमबॅक केला आहे. सध्या शहनाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शहनाज मराठी बोलताना दिसत आहे.

शहनाज मराठीत म्हणते, ‘माझं नाव शहनाज गिल आहे पुष्पा नाही…’ सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. महत्त्वाचं म्हणजे शहनाज लवकरचं अभिनेता सलमान खान स्टारर ‘कभी ईद कभी दिवाली’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा :


सिगरेटचं व्‍यसन साेडायचं आहे, ‘या’ सात टिप्स फाॅलाे करा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *