‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ने गाठला 500 भागांचा टप्पा

Entertainment

ध्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीवर सुरू आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱया या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे(Entertainment ).

मालिकेने 500 भागांचा टप्पा पार केला आहे.

अहिल्याबाई या काळाच्या पुढचा विचार करणाऱया, दूरदृष्टी असलेल्या प्रजाहितदक्ष शासक होत्या. त्यांनी आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या आधाराने समाजातील अनिष्ट रूढींना आव्हान दिले आणि लोककल्याणाची कामे करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला. शिक्षणाचा समान हक्क असो, विधवा विवाह असो, स्त्री सक्षमीकरण असो किंवा दरबार सांभाळण्याचे काम असो, उपेक्षितांना, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील चालीरीतींना आव्हान देताना त्या डगमगल्या नाहीत(Entertainment ).

मालिकेच्या यशाबद्दल यशाबद्दल अहिल्याबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणारी एतशा संझगिरी म्हणाली, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई ही माझी पहिली हिंदी मालिका आहे. अहिल्याबाईंच्या जीवनातील प्रत्येक अध्यायातून एक महान आणि प्रेरणादायक कथानक उलगडत गेले आहे. ही भूमिका म्हणजे एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

Smart News:-