‘केजीएफ- 2 ‘ मधील हा सीन पाहिल्यानंतर स्क्रिनवर नाण्यांचा पाऊस;

सध्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ (KGF Chapter 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता यशनं (yash) प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटामधील कलाकरांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रवीना टंडननं (Raveena Tandon) नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

रवीनानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये थिएटरमध्ये (kgf chapter 2) केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी दिलेली रिअॅक्शन दिसत आहे. या व्हिडीओमध्ये स्क्रिनवर रवीनाचा एक सीन दिसत आहे. या सीनमध्ये रवीना एक पुस्तक उघडते. त्या पुस्तकामध्ये केजीएफ चॅप्टर असं लिहिलेलं दिसत आहे. ते पाहताच प्रेक्षक स्क्रिनवर नाणी फेकतात.

व्हिडीओ शेअर करून रवीनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘खूप दिवसांनी लोकांना स्क्रिनवर नाणी फेकताना पाहिलं.’ व्हिडीओच्या शेवटी रवीना ‘घुसके मारेंगे’ हा डायलॉग म्हणाताना दिसत आहे.

रवीनानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करून नेटकरी म्हणाले, ‘आम्ही या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टची वाट पाहात आहोत.’ केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. तसेच यश, रवीना टंडन, प्रकाश राज आणि संजय दत्त यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :


अत्यंत धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *