राखी सावंतचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

राखी सावंत (Rakhi Sawant’s Viral Video) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. राखी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून (instagram video) अनेक व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते. अशातच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येतं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखीने वाघाच्या कातड्यासारखा एक ड्रेस घातला आहे.तिचा हा ड्रेस मागच्या बाजूने उघडा असल्यामुळे त्यामध्ये राखीची बॅक साइड दिसतं आहे. (instagram video) या संपूर्ण व्हिडीओमध्ये राखी कॅमेराकडे आपली पाठ करूनच उभी आहे.
तिच्या या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी असं म्हटलं आहे की, राखीला हा ड्रेस तिची बहिण उर्फी जावेदने (Urfi Javed) दिला आहे. तर काहींनी तिच्या या व्हिडीओवरून तिला ट्रोल (Troll) केलं असल्याचंही पाहायला मिळतं आहे.
तसेच या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला एक “तेरे बाद नजर नही आती कोई मुझे मंजिल, किसी और का होना मेरे बस की बात नही” हा शेर ऐकू येतं आहे.तसेच या शेरवरूनही राखीला खूप कमेंट्स आल्या असल्याचंही पाहायला मिळतं आहे.
हेही वाचा :