आरआरारा खतरनाक…!RRR ने जमावला इतक्या कोटींचा गल्ला!

सएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर क्रेझ वाढत आहे. वीकेंडला या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली होती. विशेष म्हणजे राम चरण (Ram Charan) आणि जूनियर एनटीआर यांच्या या पीरियड ड्रामा चित्रपटाने ६ दिवसांत जगभरात ६११ कोटींचा बिझनेस केला आहे.
येत्या काही दिवसांत तो ‘बाहुबली 1′ च्या कमाईचा विक्रम मोडेल. बुधवारी पुन्हा एकदा तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या तेलगू सिनेमाने हिंदी प्रेक्षकांवरही आपली पकड कायम ठेवली आहे. या चित्रपटाने बुधवारी केवळ हिंदी व्हर्जनमधून जवळपास 13.50 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 6 दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 120 कोटींची कमाई केली आहे.(ram charan)
सूर्यवंशी’ला टाकलं मागे
आरआरआरने अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘सूर्यवंशी’ला 120 कोटींचा आकडा गाठण्यासाठी 7 दिवस लागले. तर RRR कडे पहिल्या आठवड्यातील कमाईसाठी गुरुवार बाकी आहे. गुरुवारी पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा चित्रपट किमान 12-13 कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज आहे.
अशाप्रकारे, पहिल्या आठवड्यात हिंदी व्हर्जनने एकूण कमाई 132-133 कोटी रुपये होईल. वरवर पाहता आता RRR ची नजर ‘द काश्मीर फाईल्स’वर आहे. RRR चा हिंदी व्हर्जन 200 कोटींचा टप्पा सहज पार करेल यात शंका नाही. पण विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या एकूण कमाईचा विक्रम तो मोडू शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, RRR ने 6 दिवसात जगभरात 611 कोटींचा व्यवसाय केला आहे. यापैकी 474 कोटी रुपये फक्त देशांतर्गत बॉक्स ऑफिसचे आहेत. या चित्रपटाने हिंदी तसेच तेलुगु व्हर्जनमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.
हेही वाचा :