रणवीर सिंहने कतरिना कैफसाठी पाठवलं खास गिफ्ट..!

रणवीर सिंह  आणि शालिनी पांडे स्टारर ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचा ट्रेलर (movie trailer) काल लॉन्च झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसून येते की, हा चित्रपट मुलींच्या गर्भपाताचा मुद्दा मांडणारा आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारा आहे. हा चित्रपट 13 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कतरिना कैफने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःच्या फोटोसह एक नोट शेअर केली आहे. रणवीरने त्याला ही नोट पाठवली आहे. त्यावर महिला सक्षमीकरणाला चालना देणारी सुंदर पोस्ट लिहिली आहे.

कतरिनाची पोस्ट-

या फोटोमध्ये कतरिना कैफने हातात गुलाबी रंगाचा विदाऊट स्मेलचा साबण धरला आहे. हा साबण फ्लॉंट करताना ती स्माईलसुद्धा देत आहे. त्याच्या पुढच्या फोटोमध्ये तिने ती नोट शेअर केली आहे, जी रणवीर सिंहने म्हणजेच ‘जयेशभाई’ ने दिली आहे. हा साबण प्रवीणगडचा आविष्कार असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले.पाहूया पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे.(movie trailer)

या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “आदरणीय कतरिना जी, हा सुगंध विरहित साबण आमच्या प्रवीणगडचा आधुनिक शोध आहे. आमच्या सुनेला यानेच आंघोळ करण्याची परवानगी आहे. असं का आहे? ते आपल्यात विचारत नाही. मी तुम्हाला इथे नक्कीच बोलावले असते, पण तुम्ही आमचा टोलनाका ओलांडताच तुम्हाला ‘घुंघट’ पद्धतीचे पालन करावे लागेल. मग काहीच दिसणार नाही.”

या पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे की, “मी तुम्हाला प्रवीणगढच्या आयुष्याची एक झलक पाठवत आहे, जेणेकरून तुम्ही सहकुटुंब तुमच्या इच्छेनुसार त्याचा अनुभव घेऊ शकाल. सध्या मी हा पारंपारिक साबण पाठवत आहे. तुमचा जयेशभाई जोमदार.” ही पोस्ट शेअर करताना कतरिनाने या चित्रपटाबद्दलच्या तिच्या भावनाही शेअर केल्या आहेत. खरं तर हा सर्व रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. परंतु यातून एक मोठा मुद्दा मांडण्यात आला आहे.

 

कतरिना कैफने यावर सांगताना लिहिलंय, “सुगंध विरहित साबण. एक शांत निषेध. मुलींच्या शक्तीचा उत्सव. आम्हाला जयेशभाईंसारख्या माणसांची गरज आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक दृश्य दाखवण्यात आले आहे, जिथे गावातील एक मुलगी गावप्रमुखाला शाळेजवळ बनवलेला दारूचा ठेका बंद करण्याचे आवाहन करते, ज्यावर मुख्याध्यापक साबणाला दोष देतो आणि गावातील मुली व महिलांना सुगंध विरहित साबण वापरण्याचा सल्ला देतो.

हेही वाचा :


करिअर संपलं!…किंग कोहली पहिल्याच चेंडूवर आऊट..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *