नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स…

mumbai

साऊथ इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. एकापाठोपाठ एक अशा अनेक हिंदी सिनेमांत ती झळकणार आहे. यातलाच एक आहे ‘अ‍ॅनिमल’. या चित्रपटात रश्मिका रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor )ऑनस्क्रीन रोमान्स करणार आहे. नुकतंच मनालीत या चित्रपटाचं शूटींग झालं. शूटींग शेड्यूल संपलं आणि रश्मिका व रणबीर मुंबईत परतले. रविवारी रश्मिका मुंबईच्या (mumbai) खार भागातील एका रेस्टॉरंटमध्ये दिसली आणि तिला पाहताच चाहते जणू क्रेझी झालेत.

रश्मिकासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. रश्मिका कारकडे जात असताना तिला गर्दीनं घेरलं. यावेळी रश्मिकाने अतिशय संयमाने आणि हसतमुख चेहऱ्यानं चाहत्यांना सेल्फी दिला.

गर्दीतून वाट काढत सुरक्षा रक्षकांनी तिला तिच्या कारपर्यंत पोहोचवलं. ती कारमध्ये बसली. मात्र पापाराझींनी तिला पोझ देण्याची विनंती केल्यावर कुठलाही अ‍ॅटिट्यूड न दाखवता ती अगदी कारमधून खाली उतरली आणि तिने पापाराझींना पोझ दिल्यात.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर येताच तिच्या या वागण्याचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

‘पुष्पा’ या चित्रपटानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंगही 28 मिलियनवर पोहोचली आहे. नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका तीन बॉलिवूड चित्रपटांत झळकणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘गुडबाय’ हा सिनेमाही तिने साईन केला आहे.(mumbai)

अलीकडे शूटींगच्या निमित्ताने रश्मिकाच्या मुंबईत मुक्कामाला असते. त्यामुळे तिने मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. रश्मिका साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

हेही वाचा:


नवनीत राणांना तुरुंगात प्यायला पाणी नाही, वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही…


सोन्याच्या दरात सहाव्या दिवशी घसरण…


भर पार्टीत तिच्या ड्रेसची दोरी खेचणारी ‘ती’ व्यक्ती कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *