Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा इतका बोल्ड ड्रेस की….
रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नुकतीच करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली होती आणि त्यादरम्यान ती खूपच अनकन्फर्टेबल दिसत होती. तिच्या बोल्ड ड्रेसमधील (bold dress) कट तिला त्रासदायक जाणवत होता. त्यामुळे ती जपून चालत होती आणि अनकन्फर्टेबल वाटत होती.
दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यास उत्सुक असलेली रश्मिका मंदाना अलीकडेच करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली. यादरम्यान रश्मिकाने हॉट मॅक्सी ड्रेस (bold dress) परिधान केला होता. मात्र हा ड्रेस तिच्यासाठी खूपच त्रासदायक ठरला. कारण ड्रेसला हाताळताना तिला खूप अडचण दिसून आली.
रश्मिका मंदाना नुकतीच करण जोहर याच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली. या पार्टीत रश्मिकाने ब्लॅक बॉडीकॉन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती कमालीची बोल्ड दिसत होती. रश्मिकाचा बराचसा ड्रेस पारदर्शक होता आणि थाई हाय स्लिटमुळे अभिनेत्री खूपच अनकन्फर्टेबल दिसत होती. पायऱ्या चढताना रश्मिकाला खूप त्रास झाला आणि कशीतरी तिने आपली इज्जत वाचवली.
कन्नड सिनेमात पदार्पण
रश्मिका मंदाना हिने तिच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’मधून केली होती. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला, या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम केले. या चित्रपटानंतर रश्मिकाने आणखी दोन कन्नड चित्रपटांमध्ये काम केले – ‘अंजनी पुत्र’ आणि ‘चमक’. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला. रश्मिकाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत गेली. त्यानंतर अचानक कन्नड चाहत्यांची निराशा करत ती तेलुगू सिनेमाकडे वळली.
तेलगू सिनेमात नाव कमावले
कन्नड सिनेमा केल्यानंतर रश्मिका (Rashmika Mandanna) हिने तेलुगू इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. तिची पहली तेलुगू फिल्म विजय देवरकोंडा याच्यासोबत 2018मध्ये रिलीज झाली. या फिल्मचे नाम ‘गीता गोविंदम’ होती. हा सिनेमा सुपरहिट झाला. चाहत्यांकडून मोठी पसंती मिळाली. त्यानंतर ‘डियर कॉमरेड’ या दिसली. या दोन सिनेमानंतर रश्मिका ‘देवदास’ या फिल्ममध्ये दिसली.
बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री
गेल्यावर्षी रश्मिका मंदाना हिचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटात त्याच्यासोबत अल्लू अर्जुन दिसला होता. या चित्रपटाद्वारे रश्मिकाने श्रीवल्ली बनून लोकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. आता रश्मिका बॉलिवूडवर राज्य करण्याच्या तयारीत आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’मधून डेब्यू करणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत ‘पशु’ आणि अमिताभ बच्चनसोबत ‘गुड बाय’मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :