बबिताला इम्प्रेस करण्याच्या नादात अभिनेत्याने पार केली हद्द

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया नुकतेच त्यांचा एक रिएलिटी शो (reality show) घेवून आले आहेत. या शोमध्ये एकापेक्षा एक स्टार्स सहभागी होणार आहेत. दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ताही या शोमध्ये पोहोचली होती. या मंचावर तिला पाहून तिथे उपस्थित असलेल्या अभिनेत्याने कपडे काढायला सुरुवात केली.
‘द खतरा खतरा शो’ चा नविन सीजन
प्रतीक सहजपाल आणि उमर रियाझ यांनी ‘बबिता जी’ म्हणजेच मुनमुन दत्ताला अॅट्रक्ट करण्यासाठी त्याचं शर्ट काढलं. हे पाहून मुनमुन डोळे बंद करते. ‘द खतरा खतरा’ या शोमध्ये हे सगळं घडलं आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया त्यांच्या या शोमध्ये दररोज नवनवीन सेलिब्रिटी येतात आणि धमाल-मस्ती करणार आहेत.
लवकरच प्रतीक सहजपाल आणि उमर रियाझ देखील या शोमध्ये दिसणार आहेत. ‘बिग बॉस 15’ मध्ये प्रतीक आणि उमर रियाझच्या फाईटींगची बरीच चर्चा झाली होती. मात्र आता दोघंही ‘खतरा खतरा’मध्ये मस्ती करताना दिसणार आहेत. या एपिसोडमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ताही दिसणार आहे.
नुकताच ‘द खतरा शो’चा (reality show) प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल मुनमुन दत्ताला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी दोघंही शर्टदेखील काढतात आणि टोन्ड बॉडी फ्लॉंट करू लागतात. हे पाहून मुनमुनने लाजू लागते. खरंतर भारती आणि हर्ष यांनी उमर आणि प्रतीकला एक टास्क दिला होता की त्यांना मुनमुन दत्ताला इम्प्रेस करायचं आहे. आता यात कोण बाजी मारणार, हे येत्या एपिसोड्समध्येच आपल्याला पहायला मिळेल.
हेही वाचा :