‘झालीये ना माझी झकास एंट्री’, देवमाणूस मालिकेत या अभिनेत्रीची रिएंट्री!

devmanus serial

एप्रिल- देवमाणूस मालिकेला(devmanus serial) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता देवमाणूस 2 (devmanus 2 ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.

बज्या, नाम्या, टोन्या, बाबू, मंगल, सरू आज्जी, डिंपल या पात्रांव्यतिरिक्त आणखी बरेचसे नवखे कलाकार या मालिकेत दिसत आहेत. मात्र दुसऱ्या पर्वात वंदी आत्याची भूमिका वगळण्यात आल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. आता मात्र मालिकेत वंदी (pushpa chaudhari) अत्याची रिएंट्री झाली आहे. वंदी आत्याची भूमिका मालिकेत अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी साकारली होती.

आता त्यांची मालिकेत रिएंट्री झाली आहो. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘वंदी आत्या या देवमाणूस(devmanus serial) मधील भूमिकेवर प्रेम करणारी बरीच मंडळी मला विचारायची की तुम्ही दिसत नाही या सिझनला. परंतु आता ती प्रतीक्षा संपली व आज पासून पाहायला विसरू नका रात्री 10-30 वाजता देवमाणूस सीरियल.

अहो माझी झकास एंट्री झालिये ना. रात्री नाही जमले तर दुसऱ्या दिवशी तो एपिसोड असतो बर का…’ PHOTOS : परी म्हणू की सुंदरा.., रूपाली भोसलेच्या व्हाईट ड्रेस लूकनं वेधलं लक्ष! यासोबतच दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, ‘कालपासून टिव्ही वर देवमाणूस 2 या झी मराठी वरील सिरीयल मध्ये माझी एंट्री झाली. पहिल्या देवमाणूसच्याभागात(devmanus serial) तुम्ही सर्वांनी या वंदी आत्याला अक्षरशः डोक्यावर घेतले .

कालचा एपिसोड पाहिल्यावर सुद्धा कोणी फोन करून तर कोणी मेसेज करुन खूप कौतुक केले. बऱ्याच जणांनी व्हिडिओ काढून पाठवले. असेच प्रेम व आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी असू द्या.’ प्रेक्षकांनी देखील कमेंट करत त्यांच्या रिएंट्रीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

पुष्पा चौधरी या अभिनय तर उत्तम करतातच पण गातात देखील तितक्याच सुरेल. अनेक कार्यक्रमातून त्यांनी आपली ही कला सादर केली आहे. सामाजिक क्षेत्रात देखील त्या सक्रीय आहेत.

Smart News:-


300 मशिदी, मंदिरांना लाऊडस्पीकरबद्दल नोटिसा


संसद बरखास्त करण्याचा निर्णय चुकीचा, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी मांडले मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *