सचिनची कन्या लवकरच करू शकते बॉलिवूड डेब्यू?

bollywood

मागील काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) लवकरच बॉलिवूडमध्ये (bollywood)डेब्यू करू शकते. साराच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, तिला (Sara Tendulkar) अभिनयात आवड आहे. ती लवकरच अभिनयात डेब्यू करू शकते.अनेक सेलिब्रिटी किड्स बॉलिवूडमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे. या यादीत क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचं नावदेखील आहे.

तिचे फॅन्स मागील काही वर्षांपासून साराच्या अभिनयातील पदार्पणाची वाट पाहत आहेत. आता एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, साराला चित्रपटात काम करण्याची आवड आहे. आता असे म्हटले जात आहे की, ती लवकरच बॉलिवूड डेब्यू करू शकते.सारा काही ब्रँड्ससाठी करार करत आहे. साराने लंडन युनिव्हर्सिटीतून मेडिसिनचे शिक्षण घेतले आहे. पण, २४ वर्षांची सारा आपलं करिअर ग्लॅमर वर्ल्डमध्ये बनवू इच्छिते(bollywood).’

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सारा अधिक चर्चेत राहत नाही. त्यामुळे लोकांना तिच्या अभिनय कौशल्याविषयी माहिती नाही. ती टॅलेंटेड आहे आणि साराचे आई-वडील तिच्या निर्णयाचे समर्थन करतात. सारा प्रोफेशनल मॉडल आहे. तिचे फॅन फॉलोईंगदेखील जास्त आहे. सोशल मीडियावर तिचे फोटोंनादेखील प्रचंड लाईक्स मिळतात.’

सारा सोशल मीडिया पर खूप ॲक्टिव्ह आहे. आणि इन्स्टाग्रामवर आता तिचे १८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.काही वर्षापूर्वी ची चर्चेत आली होती की, ती शाहीद कपूरसोबत बॉलिवूड डेब्यू करू शकते. तेव्हा सचिन तेंडुलकरने या सर्व चर्चा पोकळ असल्याचं म्हणत पूर्णविराम दिला होता.

सचिन म्हणाला होता, ‘सारा आता शिक्षण घेत आहे. ती चित्रपट येण्याच्या वृत्तावरून ती खूप नाराज आहे.’ पण, आता साराने आपले विचार बदलले आहेत? आता हे वेळेनुसारचं कळेल की, सारा अभिनय विश्वात पाऊल ठेवेलं की नाही.!

हेही वाचा:


क्रेननं घेतला पती पत्नीचा जीव…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *