अभिनेत्रीला लाल साडीत पाहून विश्वासच नाही बसणार..!

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर ला तिचा जोडीदार दौलतराव सापडला आहे. हे वृत्त सोशल मीडियावर चर्चेत असताना सध्या तिच्यावर प्रेमाचा रंग चढलेला पाहायला मिळत आहे. सईचे लाल रंगाच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला.(caption)

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने ( Sai Tamhankar ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सईच्या चेहऱ्यावर प्रेमाचा रंग चाहत्यांनी पाहायला मिळाला. यावेळी ती हटके पोझ देताना ग्लॅमरस दिसत होती. तर तिच्या मोकळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. हा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोतील खास म्हणजे, सईने आपल्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

 

या फोटोच्या (caption) कॅप्शनमध्ये तिने ‘My love affair with red !’असे लिहिले आहे. याआधी सई निर्माता अनिश जोगसोबत एका फोटोत दिसली होती. सई आणि अनिशने मिळून एकत्रित अनेक चित्रपटात काम केलं आहे. सईने हा फोटो शेअर करताना ‘दौलतराव सापडला’ असा हॅशटॅग दिला आहे. यानंतर अनिश आणि ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले. लाल रंगाच्या साडीतील लईने फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनी ती अनिशच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच चाहत्यांनी सईवर प्रेमाचा रंग चाढला आहे असे म्हटले आहे. तसेच या फोटोच्या कॅप्शनवरून सई प्रेमात असल्याचे बोलले जात आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह अनेक कलाकारांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘Ok hands down the hottest I have seen you in a saree 😍’ असे फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. मराठी अभिनेत्री हर्ता दुर्गुळेने या फोटोवर कॉमेन्टस करताना एकसारखे सहा हास्याचे ईमोजी शेअर केले आहेत.

 

 

 

अभिनेत्री सोनाली खरेने ‘My goddd 🔥🔥🔥’. आणि अभिनेत्री सायली संजीवने या फोटोवर हार्ट ईमोजी शेअर केला आहे. याशिवाय एका चाहत्याने ‘सईवर प्रेमाचा रंग चढला’, ‘ये लाल इश्क ❤️’, रेड हॉट फायर🔥, तर दुसऱ्या एका युजर्सने ‘हॉट’, ‘साडीत सुंदर दिसतेस’, असे म्हटले आहे. याशिवाय सईच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक हटके आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.

हेही वाचा :


इचलकरंजी: यंत्रमाग कामगाराच्या मुलींचा राष्ट्रीय स्तरावर बोलबाला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *