भयंकर! सलमान खान करणार होता आत्महत्या; या आजारानं होता त्रस्त!

बॉलिवूडमधील दंबग खान अर्थात सलमान खान मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे सलमान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याचा फिटनेस, त्याचं वर्कआऊट हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा या फिटनेस क्रिक असलेल्या अभिनेत्यानं काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये झालेल्या आजाराबाबत (trigeminal neuralgia) सांगितलं होतं.

काय म्हणाला होता सलमान?

सलमान खानचा २०१७ मध्ये ‘ट्युबलाइट’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमाननं त्याला झालेल्या ‘ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया’ (Trigeminal Neuralgia) या आजाराबद्दल सांगितलं होतं. या आजाराला सुसायडल डिसिज (Suicidal Disease) देखील म्हणलं जातं. सलमानचा हा आजार न्यूरोलॉजिकल प्रकारात येतो. या आजाराबद्दल सलमाननं सांगितली की, ‘ हा आजार झाल्याचं २००१ मध्ये कळलं. हा आजार झाल्यानंतर माझा आवाज कापू लागला आणि कर्कश देखील झाला. त्यामुळे जेव्हा मी बोलायचो तेव्हा लोकांना असं वाटायचं की मी दारू प्यायलो आहे. परंतु या आजारामुळे मला हा त्रास होत होता. हा आजार झाल्यामुळे सातत्यानं माझ्याही मनात आत्महत्येचे विचार यायचे. इतकंच नाही तर मला वेदनाही व्हायच्या. त्या काळात मी फारसं बोलूही शकायचो नाही. त्यानंतर मी माझ्या तब्येतीकडे गंभीरपणे बघायला सुरुवात केली. या आजारावर अमेरिकत जाऊन योग्य उपचार घेतले. त्यानंतर या वेदनादायी आजारातून मी बरा झालो आहे.’

सलमाननं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ हा आजार ज्या व्यक्तींना होतो, त्यांना अत्यंत वेदना होतात. त्या वेदना सहन करणं अनेकदा कठीण जातं आणि त्यातूनच ते आत्महत्या करतात.’

सलमानला अॅक्शन सीन करायला होती मनाई

ट्रायजेमिनल न्युरोलॉजी आजार झाल्यामुळे सलमानला सिनेमात काम करायला मनाई केली होती. परंतु त्यानंतरही सलमाननं सिनेमात काम केलं होतं. मात्र, सिनेमात काम करत असताना अॅक्शन सीन करू नकोस असं डॉक्टरांनी बजावलं होतं. अर्थात सलमाननं त्यानंतरही अनेक सिनेमांत थोडेफार का होईना अॅक्शन सीन केलेच होते. आपल्या चाहत्यांना आजारी सलमान दाखवणं हे त्याच्या स्वभावाला मानवणारं नव्हतं.

कोमात जाऊ शकत होता सलमान

खरं तर सलमानला डॉक्टरांनी सिनेमात काम करू नको असं बजावलं होतं. तरी देखील सलमाननं सिनेमात काम केलं, अॅक्शन सीन देखील केले. याच काळात आलेल्या ‘बॉडीगार्ड’,’दबंग २’ सिनेमात सलमाननं केलेले अॅक्शन सीन चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. या सिनेमातील एखादा अॅक्शन सीन करताना जर तेव्हा सलमानला दुखापत झाली असती, तर तो कोमातही जाऊ शकत होता. परंतु सलमाननं सावधगिरी बाळगत त्याचं काम केलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

काय आहे आजार

ट्रायजेमिनल न्युरोलॉजी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यांच्या नसांवर परिणाम होतो. त्यामुळे त्याला प्रचंड डोकेदुखी होते. हा आजार झालेल्या व्यक्तीला शरीरामध्ये इलेक्ट्रिक शॉक लागल्यावर जशा वेदना होतात तशा वेदना होतात. या वेदना असह्य होत असल्यानं अनेकदा हा आजार झालेल्या व्यक्ती आत्महत्या देखील करतात. त्यामुळेच या (trigeminal neuralgia) आजाराला सुसाईड डिसिज देखील म्हणतात. या आजाराची लक्षणं कळत नाही. सुरुवातीच्या स्टेजमध्ये दातांमध्ये वेदना होऊ लागतात. त्यामुळे अनेकदा यात दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार केले जातात.

दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल सांगायचं तर लवकरच त्याचा ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी दिसणार आहेत. त्यानंतर कभी ईद कभी दिवाली या सिनेमातही तो दिसणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर पूजा हेगडे असणार आहे.

हेही वाचा :


भन्नाट प्लान! फक्त ७५ रुपयात मिळेल २८ दिवसांची वैधता..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *